सांस्कृतिक महोत्सव अहवाल: ‘अगस्त्य 2k26’
संस्थेचे नाव: मातोश्री आयुर्वेद कॉलेज
कार्यक्रमाचे नाव: अगस्त्य 2k26
कालावधी: २७ ते ३० जानेवारी २०२६
स्थळ: कॉलेज परिसर आणि आसरा लॉन्स, येवला.
१. प्रस्तावना
मातोश्री आयुर्वेद कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘अगस्त्य 2k26’ हा सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. २७ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा आणि दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दररोज परंपरेनुसार धन्वंतरी स्तवनाने करण्यात आली.
२. दैनंदिन कार्यक्रमाचा तपशील
दिवस १: पारंपारिक दिवस (Traditional Day)
कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय प्राचार्या डॉ. ज्योती बडवे मॅम यांच्या हस्ते धन्वंतरी स्तवन करून झाली. या दिवशी विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे पेहराव केले होते. ज्युनिअर विद्यार्थ्यांचा ‘रॅम्प वॉक’ हे या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले. यामध्ये विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना साडी नेसवून एक मजेशीर उपक्रम राबवला. दिवसाची सांगता सर्वांच्या सामूहिक नृत्याने झाली.
दिवस २: बॉलीवूड डे (Bollywood Day)
दुसऱ्या दिवसाची सुरुवातही धन्वंतरी स्तवनाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध बॉलीवूड पात्रांच्या (Characters) वेशभूषा करून सर्वांचे मनोरंजन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे वैयक्तिक आणि ग्रुप परफॉर्मन्स सादर झाले.
दिवस ३: साडी आणि टाय डे (Saree & Tie Day)
या दिवशी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अत्यंत औपचारिक आणि सुंदर पेहरावात आले होते. प्राचार्यांच्या उपस्थितीत धन्वंतरी स्तवन करून दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्याचा आनंद लुटला.
३. मुख्य कार्यक्रम: वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Day)
महोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच ‘अॅन्यूअल डे’ येवला येथील ‘आसरा लॉन्स’ येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला.
प्रमुख पाहुणे:
१. डॉ. भारती सतीश वेलजाळे (प्राचार्या, एस.एन.डी. नर्सिंग कॉलेज, बाभुळगाव)
२. पवन आव्हाड सर
३. डॉ. ज्योती बडवे मॅम (प्राचार्या, मातोश्री आयुर्वेद कॉलेज)
आणि सर्व टीचिंग स्टाफ.
कार्यक्रमाची रूपरेषा:
डॉ. भारती मॅम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन करण्यात आले. पाहुण्यांच्या प्रेरणादायी भाषणानंतर ‘गणेश वंदने’ने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. यामध्ये डान्स, पोएट्री, शायरी, ड्रामा आणि रॅम्प वॉक असे भरगच्च कार्यक्रम सादर झाले. विशेष आकर्षण म्हणजे प्राचार्या डॉ. ज्योती बडवे मॅम यांनी गायलेले गाणे, ज्याला सर्वांनी दाद दिली.
४. पारितोषिक वितरण समारंभ
दुपारच्या भोजनानंतर वर्षभरातील विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा गौरव करण्यात आला:
* स्पोर्ट्स डे: खेळांमधील विजेत्यांना डॉ. भारती मॅम, आव्हाड सर आणि प्राचार्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
* विद्यापीठ गुणवंत: युनिव्हर्सिटी परीक्षेत टॉप आलेल्या विद्यार्थ्यांना मेडल्स, ट्रॉफी, सर्टिफिकेट्स आणि प्राचार्यांकडून रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
* विशेष पुरस्कार: यावर्षीचा मानाचा ‘Student of the Year’ पुरस्कार समीर चव्हाण याला देण्यात आला.
* स्मृती प्रित्यर्थ बक्षिसे: वैद्य दिलीप प्रभाकर गाडगीळ सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राचार्या डॉ. बडवे मॅम यांच्याकडून विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
५. समारोप
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन (Vote of Thanks) करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘डीजे’च्या तालावर मनसोक्त डान्स केला आणि ‘अगस्त्य 2k26’ ची सांगता अत्यंत आनंदी वातावरणात झाली.
SPORTS DAY FROM 20/01/2026 to 24/01/2026
Day-1
Principal mam Dr. Jyotee Badave यांच्या हस्ते truff मध्ये धन्वंतरी पूजन करुन Cricket या Game ची सुरुवात झाली.
त्यानंतर कॉलेज च्या मैदानात Seniour Juniour तसेच super Juniour Boys ची Cricket match झाली.
Day-2
या दिवशी म्हणजेच 21/01/26 रोजी कॉलेज मैदानात girls Cricket Match झाल्या.
तसेच याच दिवशी मुलींची kho kho ची match झाली.
Day-3
या दिवशी indoor games (carom & chess) हे दोन games Seminor hall मध्ये घेण्यात आले.
तसेच या दिवशी कांचनसुधा मैदानात दुपारी मुलांची vollyall Matches झाल्या.
Day-4
या पूर्ण दिवशी All Badminton Matches घेण्यात आल्या.
Day-5
या दिवशी कांचनसुधा मैदानात मुलांची Final Vollyball match घेण्यात आली..

















