Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

श्री गणेशोत्सव २०२६

Home

श्री गणेशोत्सव

            पाच दिवसीय कार्यक्रमाचा अहवाल

            कालावधी : १४/०९/२०२६ ते १८/०९/२०२६

दिवस १ – गणेश स्थापना व स्वागत

            गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९.३० ते ११.०० या वेळेत ढोल-लेझीमच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये श्री गणेश मूर्तीचे आगमन व स्वागत करण्यात आले. सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत विधिवत गणेश पूजन करण्यात आले. पूजेनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. कनिष्ठ विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. सायंकाळी भक्तिभावाने गणेश आरती संपन्न झाली.

दिवस २ – अथर्वशीर्ष, खेळ व शैक्षणिक उपक्रम

            दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० ते ११.३० या वेळेत प्राचार्य डॉ. ज्योती बडवे यांच्या उपस्थितीत हॉस्पिटलमध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले. दुपारच्या विश्रांतीनंतर शैक्षणिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ४.३० वाजता गणेश आरती करण्यात आली.

दिवस ३ – शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम

            तिसऱ्या दिवशी पूर्वार्धात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. भोजनानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायंकाळी ४.३० वाजता गणेश आरती भक्तिभावाने संपन्न झाली.

दिवस ४ – सत्यनारायण पूजा व सांस्कृतिक उपक्रम

            चौथ्या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत विधिवत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर भोजनासाठी विश्रांती देण्यात आली. भोजनानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले.

दिवस ५ – महाप्रसाद व गणेश विसर्जन

            गणेशोत्सवाच्या पाचव्या व अंतिम दिवशी सकाळी ११.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर दुपारी २.००/३.०० वाजता भक्तिभावाने श्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढून गणरायाला निरोप देण्यात आला.

समारोप

            अशा प्रकारे श्री गणेशोत्सवाचा पाच दिवसीय कार्यक्रम धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.विद्यार्थी समितीचे योगदान श्री गणेशोत्सवाच्या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये विद्यार्थी समितीने अत्यंत उत्साहाने, जबाबदारीने व एकजुटीने सहभाग घेतला. कार्यक्रमातील विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व मनोरंजनात्मक उपक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी समितीतील सर्व विद्यार्थ्यांनी परस्पर सहकार्याने काम केले. प्रत्येक उपक्रमाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

विद्यार्थी समिती :
Mr. Shaikh Muzammil – General Secretary (GS)
Ms. Sayali Jadhav – Cultural Secretary (CS)
Mr. Arkan Khan – Finance Secretary (FS)
Mr. Sachin Nagul – Sports Secretary (SS)
Ms. Sakshi Adhav – Sports Secretary (SS)
Mr. Tanmay Nandalwar – Anti-Ragging Committee Representative
Ms. Pratiksha Tekale – Anti-Ragging Committee Representative
Ms. Vishwesha Chaudhary – Class Representative (CR)
Ms. Imrana Shaikh – Ladies Representative (LR)
            या सर्व विद्यार्थ्यांनी एकजुटीने, शिस्तबद्ध पद्धतीने व संघभावनेने काम करून गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष योगदान दिले.

            या संपूर्ण आयोजनास Principal Dr.Jyotee Badave ma’am, Dr. Pallavi Mukke व Mrs. Rohini More यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समितीने सक्रिय सहभाग नोंदविला.

समारोप

            अशा प्रकारे श्री गणेशोत्सवाचा पाच दिवसीय कार्यक्रम धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी समिती यांच्या समन्वयाने आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.